स्मिता पाटील (IFS)
स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर अतिशय नेमका अभ्यास करायला हवा सांगतेय युपीएससीच्या परीक्षेत २०११ साली आयएफएस ( इंडियन फॉरेन सर्व्हिस) मध्ये निवडली गेलेली स्मिता पाटील...
प्रेरणा -
माझ्या घरी प्रशासनाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. वडील जवाहर नवोद्य विद्यालयात शिकवायचे. पण लहानपणापासूनच मला प्रशासकीय सेवेचं आकर्षण वाटत होतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असा निर्णय घेतला. हा निर्णय माझाच होता.
पूर्व मुख्य परीक्षेची तयारी -
मी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून एमएससी ऍग्रीकल्चरमध्ये केलं. ऑक्टोबर २००८ पासून मी अभ्यासाला सुरूवात केली. एक बर्यापैकी माहिती असलेला कोणीही साधारण ६ महिन्याच्या अभ्यासावर पूर्व परीक्षा पास होऊ शकतो. मात्र अभ्यास हा फारच नियोजनबद्ध हवा. सिलॅबसचा अभ्यास अर्थातच पहिली पायरी आहे. पेपर सोडवण्यावर माझा खूप भर होता. मी अभ्यास कमी केला पण ज्याला पॉईंटेड म्हणता येईल असा केला. शेवटच्या क्षणी वाचता यावं म्हणून स्वतच्या शॉर्ट नोट्स काढल्या होत्या त्याचा मला खूप फायदा झाला. याशिवाय टिव्हीवरच्या बातम्या एेकणे, काही चांगले चर्चांचे कार्यक्रम बघणे ( लोकसभा आणि एनडीटीव्ही), चांगल्या वेबसाईट्स बघणे, चांगल्या वक्त्यांची भाषणं एेकणे या सगळ्यांचा खूप उपयोग होतो.
संदर्भ पुस्तकांची यादी -
भूगोल -
१० वी , ११ वी आणि १२ वीचे एनसीईआरटीचे पुस्तकं.
सर्टिफिकेट फिजीकल अँड ह्यूमन जिऑग्राफी - गोह चेंग लिआँग
फिजिकल जिऑग्राफी – सविंद्र सिंग
क्लायमॅटॉलॉजी – डि.एस. लाल
इंडिया - अ कॉम्प्रिहेन्सिव जिऑग्राफी- खुल्लार
जिऑग्राफीकल थऑट - माजिद हुसेन
स्पेक्ट्रम गाईड
लोकप्रशासन -
पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन – लक्ष्मीकांत
न्यू होरायझॉन आॅफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन – मोहित भट्टाचार्य
इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन – अरोरा अँड गोयल
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स – प्रसाद अँड प्रसाद
यशाचं सूत्र -
स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी पदवी परीक्षेपासूनच तयारीला सुरूवात करा असं मी जरूर सांगेन. डिव्होशन हे तर आवश्यक आहेच पण त्यासोबतच दिवसांचं नियोजन आणि त्या नियोजनाची कठोर अंमलबजावणी ही देखील खूप महत्वाची आहे. पेपर सोडवताना तुम्ही कुठल्या माईंड सेटने तो सोडवता हे तपासून बघणं गरजेचं आहे. सोबतच मी हे म्हणेन की बरेच लोक युपीएससीचा पहिला अटेम्प्ट खूप कॅज्युअली देतात. तसं करणं चुकीचं आहे. कारण दुसर्या अटेम्प्टला मग अभ्यास करण्यातली मजा आणि नाविन्य निघून जातं तेव्हां पहिलाच अटेम्प्ट गांभिर्याने देणे गरजेचे आहे.