IPS अनिल पारस्कर
जिद्द, चिकाटी ठेवली आणि खूप मेहनत घेतली की यश नक्की मिळते, हे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वैशिष्ट्य आहे. हे लक्षात घेवून तयारी करा आणि आपण यशस्वी होणारच असा विश्वास बाळगा असे आवाहन या परीक्षेत यशस्वी झालेल्या अनिल पारस्कर यांनी महान्यूजशी बोलतांना व्यक्त केला.
प्रश्न:- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी सुरु केला?
उत्तर:- मी बारावीपर्यंत अकोला येथे होतो. बारावीत दोन वर्षे नापास झालो. त्यामुळे थोडासा नाराज झालो होतो. त्यावेळी चांगली दोन पुस्तके वाचनात आली. 'तांबट फुटी' हे गो.नी.दांडेकर यांचे पुस्तक आणि 'झाडाझडती' हे विश्वास पाटील यांचे पुस्तक. या पुस्तकात जिल्हाधिकारी खूप चांगल्याप्रकारे काम करु शकतो असा आशय आहे. ते वाचून वाटले की आपण या क्षेत्रात काहीतरी करु शकतो. त्यावेळी ठरवले बारावी पास झाल्यावर आपण आय.ए.एस.ची तयारी करायची. यासाठी मला घरच्यांनी खूप पाठींबा दिला. तुला जे करायचे आहे ते कर असे ते सांगत. घरचे फारसे शिकलेले नाहीत. तरीही मला मोकळीक चांगली दिली. दुसरे म्हणजे मित्र खूप चांगले मिळाले. मित्रांनी सतत मानसिक आधार दिला.
प्रश्न:- अभ्यास कशा रितीने करायचा असे ठरविले?
उत्तर:- पुण्याला आल्यावर मी बी.एस.सी. पूर्ण केले. त्यानंतर पुण्याला इतिहास विषयाचे मार्गदर्शन घेतले आणि थेट पूर्व परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्यानंतर एलएलबी करत होतो. पण सहा महिन्यानंतर लक्षात आले आपण दोन्ही गोष्टींना न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करु लागलो.
प्रश्न:- इतिहास विषय का निवडला?
उत्तर:- इतिहासविषयक कादंबर्या बर्याच वाचल्या होत्या. त्यामुळे सहा महिने आवडीने अभ्यास केला. मी मराठी माध्यम निवडले होते. मराठी माध्यमातून इतिहास विषयाची बरीच पुस्तके आहेत. पुण्यात इतिहास विषयाचे उत्तम मार्गदर्शन मिळते आणि महाराष्ट्रातून इतिहास विषय घेऊन उत्तीर्ण होणारी बरीच मुले आहेत.
प्रश्न:- मार्गदर्शन मिळत नसल्याने परीक्षेला बसत नाही, असे म्हणणार्या मुलांसाठी आपण काय सांगाल?
उत्तर:- ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. स्वत: चांगला अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. अभ्यास करताना कोणती दिशा ठरवावी, दृष्टीकोन कोणता ठेवावा आणि नेमका काय अभ्यास करायचा हे समजल्यावर स्वत:च्या गावात सुध्दा अभ्यास करु शकतो. वृत्तपत्र आणि इंटरनेट खेडयात पोहोचले आहे. त्याद्वारे खूप अभ्यास होतो. यावेळी महाराष्ट्रातील जे पहिले पाच उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, त्यांनी कधीही दिल्लीला जाऊन अभ्यास केला नाही. पुण्यात किंवा स्वत:च्या घरी अभ्यास केला आहे.
प्रश्न:- पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची?
उत्तर:- पूर्व परीक्षेला एका प्रश्नाला चार पर्याय असतात. त्यापैकी योग्य उत्तर निवडायचे असते. एक वैकल्पिक विषय आणि दुसरा सामान्य अध्ययन विषय असतो. सामान्य अध्ययनाचा एकंदरीत आवाका फार मोठा असतो. मे महिन्यात परीक्षा असते. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत अभ्यास पूर्ण होऊन त्यानंतर उजळणी झाली पाहिजे.
प्रश्न:- मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची?
उत्तर:- तुम्हाला असणार्या माहितीचे आकलन आणि विश्लेषण कसे करता, हे तुम्हाला मुख्य परीक्षेत विचारले जाते. मुख्य परीक्षेला एका गोष्टीवर अनेक अंगांनी विचार करुन उत्तर लिहावे लागते. उदा. भारतातील क्रांतीकारी चळवळीचे स्वरुप स्वातंत्र्यापर्यंत कसे बदलत गेले?, असा प्रश्न होता. हा प्रश्न पूर्व परीक्षेत असता तर कोणत्या क्रांतीकारकांनी कोणती संघटना स्थापन केली किंवा कोणत्या चळवळीत भाग घेतला असा विचारला गेला असता. मुख्य परीक्षेत त्याचे उत्तर लिहिताना सुरुवातीच्या काळात हिंसक नंतर समाजवादी वळण, १९४२ चे आंदोलन, गांधीवादी, पत्रीसरकारसारखी स्वत:ची सरकार स्थापन केली म्हणजे पहिल्या टप्प्यात कोणी कोणत्या चळवळीत भाग घेतला हे माहिती करायचे आहे. पण पुढच्या टप्प्यात त्या चळवळीचे ध्येय काय, लक्ष्य काय आणि स्वरुप कसे होते हे माहित करायचे होते.
प्रश्न:- मुलाखतीची तयारी कशी करायची?
उत्तर:- मुलाखतीत सखोल ज्ञान किती आहे हे पाहिले जाते. भगतसिंग यांचे विचार भारतासाठी योग्य होते का? भगतसिंगांच्या मागे फार लोक नव्हते पण गांधीजींच्या मागे खूप लोक होते, तुम्हाला काय वाटते? भगतसिंगांचा मार्ग योग्य होता का? अशा स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात. भगतसिंगांना वाटत होते की हिंसक मार्गाशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. गांधीजींना वाटत होते हिंसक मार्ग अवलंबल्यावर लोक पाठीशी उभे राहणार नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजू पटवून देऊन संतुलीत उत्तर द्यायचे असते. मुलाखतीत पूर्वग्रहदूषित विचार असता काम नये.
प्रश्न:- भाषेचे माध्यम कोणते घ्यावे असे तुम्हाला वाटते?
उत्तर:- मराठी माध्यमातूनही चांगले मार्क मिळत आहेत. गेले पाच सहा वर्षे खूप मुले मराठीतून उत्तीर्ण होत आहेत. इंग्रजीतूनही बरेचजण उत्तीर्ण होत आहेत. मराठीत चांगली पुस्तके कमी आहेत. त्यासाठी इंग्रजीचे आकलन होणे गरजेचे आहे. पण मुलाखत किंवा परीक्षा कोणत्याही माध्यमातून दिली तर मार्क्स नक्की मिळतात.
प्रश्न:- परीक्षा उत्तीर्ण झाला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती?
उत्तर:- मी पुण्यात होतो. मला मित्रांनी सांगितले, तू पास झालास. मग मी घरच्यांना सांगितले, मी पास झालोय. त्यांना विश्वास बसला नाही. मग वडिलांनी भावाला पाठविले. त्याने इंटरनेटवर निकाल पाहिला आणि वडिलांना सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी त्या दिवसभरात चारशे ते पाचशे लोकांना फोन करुन सांगितले.
प्रश्न:- प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणार्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
उत्तर:- पूर्व परीक्षेला जाण्याअगोदर एक वर्षभर तयारी केली तर त्याला आदर्श तयारी म्हणता येईल. वाचण्यासाठी लागणार्या पुस्तकांची लिस्ट बनवून ती पुस्तके आणायची.वाचायची. दहा ते बारा तास अभ्यास करायला हवा. बर्याचदा मला असे वाटायचे, इतिहासात आपण स्वत: उभे राहून घटना पाहतो आहे एवढी एकाग्रता हवी आहे. या परीक्षेची तयारी करताना कोणताही विचार करायचा नाही. ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे एकाग्रता वाढते. अभ्यासाला बसण्याची क्षमता वाढते.
प्रश्न:- मुलाखतीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर:- मुलाखत पूर्वग्रहदूषित नको. पॅनेलसमोर हसतमुख गेले पाहिजे. शांत डोक्याने विचार करुन उत्तर द्यायला हवे. दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडता यावरुन ते तुमची निर्णय क्षमता पाहतात. सामाजिक प्रश्न सोडविणारा व्यक्ती म्हणून ते आपल्याकडे पाहतात. सामाजिक प्रश्नांच्या दोन्ही बाजूंची तयारी केली तर अवघड जात नाही. मला प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्र प्रगत राज्य आहे पण गुन्हेगारी वाढते आहे ही विसंगती समजावून सांग. मी त्यांच्या या मुद्दयावर हरकत घेतली. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे पण गुन्हेगारीचे हे राज्य नाही. मग मुंबईत काय आहे असे ते म्हणाल्यावर मी सांगितले, मुंबईत एकीकडे श्रीमंती आहे आणि दुसरीकडे गरीबी आहे. येथे खंडणी गोळा करुन गुन्हेगार मोठे झाले. हे भारताचे आर्थिक केंद्र असल्याने याच ठिकाणी ते वाढत आहे.