सापांमध्ये विषारी, बिनविषारी असे दोन प्रकार तर आहेतच पण काही साप निमविषारीसुद्धा असतात. साप चावलेल्या व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे दिसतात यावरून तो साप विषारी आहे की नाही ते लक्षात येते.
लक्षणे :
१] साप चावलेल्या जागेवर जळजळ झाली नाही, सूज आली नाही तर साप बिनविषारी होता असं समजायला हरकत नाही.
२] साप चावलेल्या ठिकाणी जळजळ होणे, सूज येणे, अंग जड होणे, जीभ जड होणे, दातखिळी बसणे साप चावला असेल त्या ठिकाणी फोड येणे, नाडीचे ठोके अनियमित होणे, नाकातोंडातून रक्त येणे. लघवीतून रक्त पडणे, हिरडीतून रक्त येणे, लघवीतून रक्त पडणे ही साप चावल्याची काही सामान्य लक्षणे आहेत.
प्रथमोचार :
१] जखम स्वछ धुवून घ्यावी.
२] रुंद क्रेप किंवा साध्या कापडाचे बँडेज साप चावलेल्या जागेवर बांधावे.
३] जर शरीराच्या कोणत्याही अवयवातून रक्तस्राव होत असेल तर बँडेज बांधू नये.
४] व्यक्तीला आधार देणे हे सर्वात महत्त्वाचे. चालण्यामुळे किंवा बोलण्यामुळे त्या व्यक्तीची शक्ती खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.
अ] उंच वाढलेल्या गवताच्या जागी जाणे टाळावे. पायवाटेनेच जावे.
ब] हातात काठी घ्यावी. काठी आपटत आपटत शेतातून जावे, नाइलाजच असेल तर पायात बूट घालवेत, पोटरी आणि पोटरीचा भाग जाड आवरणाने झाकावा.
क] डोंगरकपारी किंवा कडे चढताना दोन दगडांमधे हात ठेवण्याचा प्रसंग येतो. अशा वेळेस दगडांमधील जागेत काही नाही ते तपासून घ्यावे.
ड] चूलीच्या जवळपास लाकडे-काटक्या यांचा ढीग करून ठेवू नये.
इ] साप घरात आला तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. कपाट, पलंग यांच्या खाली जाऊन लपून बसणार नाही याची काळजी घ्यावी.
फ] काही धाडसी तरुण हाताल रुमाल बांघून किंवा हातमोजे घालून सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न करू नये.
ज] घराच्या आजूबाजूला खरकटे अन्न, ओलावा असेल तर उंदीर अशा भागात येतात, उंदरांचा पाठलाग करत साप घरात शिरतात. घराबाहेरच्या जागेत कुठेही ओलावा अडगळ ठेवू नये.