भारतातील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती....

जिचकारांनी आपल्या शिक्षणाची सुरवात हि एम.बी.बी.स. अभ्यासक्रमापासून केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेवून एल.एल.म. पदवी घेतली. त्यांनी इ.स. १९९० पर्यंत एकूण ४२ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. विद्यापीठाची सर्वात मोठी पदवी डी.लिट.ही संस्कृत या विषय मध्ये मिळवली. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.


कारकीर्द -

सामाजिक :

त्यांनी इ.स. १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली व इ.स. १९८० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. ४ महिन्यामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी या सेवेचा राजीनामा दिला. ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते.

राजकीय :

जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये इ.स. १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते. त्यांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता. इ.स. १९९२ साली त्यांची भारताच्या राज्यसभेवर निवड झाली. ते इ.स. १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो व युनिस्को संघटनांसाठी ही काम केले.


निधन :

जिचकारांचा २ जून, इ.स. २००४ रोजी नागपुराजवळ कोढली गावानजीक घडलेल्या कार-अपघातामध्ये मृत्यू झाला.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream