साताऱ्याचा सिंघम

K. M. PRASANNA
पोलीस खात्यावर आधारित सिंघम चित्रपटाची सध्या समाजात जोरदार चर्चा सुरु आहे. याच अनुषंगाने सातारा जिल्हा नवनियुक्त पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी जिल्ह्यात कुणाची ही तमा न बाळगता केलेल्या धडक कारवायांमुळे सातारा जिल्ह्यात सर्व स्तरात चर्चा सुरु आहे ती एस. पी प्रसन्ना इज द रियल सिंघम इन सातारा. सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक शहीद अशोक कामटे यांच्या नंतर बरयाच वर्षांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी डायरेक्ट आय. पी. एस.अधिकारी म्हणून के. एम. एम. प्रसन्ना यांची काही महिन्यापूर्वी नियुक्ती झाली आहे. नियुक्तीच्या पहिल्या दिवशीच त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या भागातील अवैध धंधे बंद करण्यासाठी आठ दिवसाची मुदत दिली. आठ दिवसानंतर मी माझ्या पद्धतीने काम करणार असे सुनावले. व आज त्यांच्या पद्धतीने काम ही चालू केले आहे. या नंतर कुणाची ही तमा न बाळगता सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचा धाडसी व क्रांतिकारी निर्णय घेतला.या निर्णयाचे जनतेतून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील अवैध वडाप वाहतूक पूर्ण पणे बंद केली. वडाप वाहतूक बंद केली असली तरी वडाप वाहतूकदार कायम उपाशी राहू नयेत म्हणून अवैध वडाप वाहतूक वैध्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी वडाप वाहतूकदारांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर बैठक घडवून आणली त्या नंतर परिवहन विभागाकडून वाहतूक परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात दादा , बाबा, राजे, पवार तसेच अशा चूकीच्या पद्धतीने बनविलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या नंबर प्लेट्स वर कारवाया करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे. विशेष म्हणजे या कारवाई मध्ये पोलिसांच्या दुचाकी ही वाचू शकल्या नाहीत. रात्री ११ नंतर जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स , ढाबे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. व या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यामध्ये ११ च्या आत घरात अशी स्तिथी दिसत आहे .त्यामुळे महिला वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत एक शेतकऱ्याचे पाकीट मारले गेले. त्या ठिकाणी संबंधित शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेला. परंतु तेथे त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही. म्हणून तो शेतकरी पोलीस अधीक्षकांकडे आला व सर्व हकीकत सांगितली. पोलीस अधीक्षकांनी त्या गावच्या पोलीस अधिकाऱ्याला नुसताआदेश ना देता आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream