कन्सेप्च्युअल क्‍लॅरिटी महत्वाची

मोक्षदा पाटील (IPS)


पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात प्रीलिमच फेल, तिसऱ्या प्रयत्नात इंटरव्ह्यूपर्यंत मजल आणि अखेर चौथ्या प्रयत्नात 2011 च्या युपीएससी परीक्षेत मोक्षदा पाटील संपूर्ण भारतात 237 वी आली. जाणून घेऊया तीचा हा प्रवास 

प्रेरणा - 
वडील ठाणे महानगर पालिकेत एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर होते. टी चंद्रशेखर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त कलेक्‍टर असताना त्यांनी जो रस्ता रुंदीकरणाचा धडाकेबाज कार्यक्रम हाती घेतला तो सगळ्या
 महाराष्ट्राला माहिती आहेच. माझ्या वडिलांनी त्या काळात अक्षरश: 20-20 तास काम केलं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की विकास कामात प्रशासन किती महत्वाची भूमिका बजावू शकतं आणि एक अधिकारी काय करू शकतो. आणि हीच माझी प्रशासनात येण्यामागची प्रेरणा आहे.

पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी -
तिसऱ्या प्रयत्नापासून मी खऱ्या अर्थाने तयारीला सुरूवात केली. माझं एम.ए. सोशॉलाजीत झालं असल्याने एक ऑप्शन सोशॉलॉजी होताच दुसरा मी मराठी लिटरेचर घेतला. मराठी लिटरेचरचे बरेच पेपर सोडवले. पूर्व परीक्षेसाठीही जेवढे जास्त पेपर सोडवून बघाल तेवढं चांगलं आहे. जनरल स्टडीजचा अभ्यास करताना आणि एकूणच कन्सेप्च्युअल क्‍लॅरिटी महत्वाची आहे. जुन्या पेपरचं ऍनालिसीस करणं खूप आवश्‍यक आहे. त्यामुळे तुम्हाला युपीएससीचं बदलतं ओरिएंटेशन कळतं.

संदर्भ पुस्तकं -
1) हरलोंबस
2)मॅकआयव्हर अँड पेज
3)पेंग्विन किंवा ऑक्‍सफर्डची समाजशास्त्राची डिक्‍शनरी
4) मॅंडेलबाम
5)बॉटमोर
6)चेंजिंग इंडियन सोसायटी- योगेश अटल
7)सोशल मुव्हमेंट्‌स इन इंडिया - एम.एस.ए.राव
8)कास्ट इन इट्‌स टवेंटिएथ सेंच्युरी अवतार - एम.एन.श्रीनिवास
9)ट्रायबल इंडिया - नदीम हसनैन
10)सोशल ऍन्थ्रॉपॉलॉजी - मदन अँड मजुमदार
11) इंडियन सोसायटी - सी.एन.शंकरराव
12)सोशॉलॉजी - सी.एन.शंकरराव
13) इंडियन सोशॉलॉजिकल थिंकर्स - बी.के.नागला
14) जुने सोडवलेले पेपर्स - क्रॉनिकल पब्लिकेशन
15) मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन - योगेंद्र सिंग
16) सोशल मुव्हमेंट्‌स इन इंडिया - घनश्‍याम शहा
17) सोशल स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी - के.एल.शर्मा

तयारी -
तयारी करताना मी प्रामुख्याने इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला. वेगवेगळ्या लोकांशी, मित्र मैत्रिणींशी चर्चा केली. चर्चेतून एखाद्या विषयाचे निरनिराळे पैलू कळण्यास मदत होते. शिवाय वृत्तपत्र, मॅगझीन्स, टी.व्ही. शोज बघितले.

यशाचं सूत्र -
माझे पहिले दोन अटेम्प्ट सीरियसली दिले नव्हते. तिसऱ्या अटेम्प्टपासून मी खऱ्या अर्थाने तयारी सुरू केली. त्यामुळे अगदी प्रत्येक अटेम्प्ट सीरियसली द्या हे मी जरूर सांगेन. पहिल्या दोन प्रयत्नात मला परीक्षेची पूर्ण कल्पना मला आली नव्हती आणि मार्गदर्शनाचाही अभाव होता. तेव्हा परीक्षेचं स्वरूप नीट समजून घेणं खूप आवश्‍यक आहे. सोबतच करिअरचा प्लॅन बी तयार असल्यास अधिक निश्‍चिंतपणे अभ्यास करता येतो.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream